Thursday, June 26, 2014

पहिले अतिवृष्टी व गारपीट आता पावसाच्या दडीमुळे विदर्भाच्या २० लाखावर आदिवासींची उपासमार सुरु : सर्व आदिवासींना खावटी वाटप सुरु करा

पहिले अतिवृष्टी व गारपीट आता    पावसाच्या दडीमुळे विदर्भाच्या २० लाखावर  
आदिवासींची उपासमार सुरु : सर्व आदिवासींना खावटी  वाटप सुरु करा 
विदर्भ -२५ जून २०१४
मागील वर्षी जून ते ऑगस्ट अतिवृष्टी व नंतर मार्च महिन्यात गारपीट यामुळे  विदर्भाच्या २०लाखावर आदिवासी कुटुंबे उपासमारीला तोंड देत असून मान्सूनच्या पावसाने दांडी दिल्यामुळे  आदिवासी  शेतकरी दुबार पेरणीच्या संकटात तर आदिवासी शेतमजूर रोजगार नसल्यामुळे उपासमारीला तोंड देत आहे . कर्जबाजारी  हताश आदिवासी शेतकऱ्यांनी  आत्महत्या सुद्धा केल्या आहेत तर हजारो  आदिवासी कुपोषणाचे  बळी पडत आहेत  यातच मागील चार आदिवास्याना  पुरवठा विभागामार्फत  अन्नाचे  वाटपही  होत नसून सर्वत्र  आदिवासींची  रोजगाराच्या संधी उपलब्ध होत नसल्याने आदिवासींना काम करण्यासाठी दूरवर भटकंती करूनदेखील रोजगार उपलब्ध होत नसून  तसेच उत्पन्न येण्यासाठी दुसरे साधन नसल्यामुळे कुटुंबाच्या उदरनिर्वाहासाठी रोजगाराच्या दिशेने भटकंती करावी लागत आहे मात्र  तरीही रोजगार उपलब्ध होत नाही.त्यामुळे अतिदुर्गम भागातील आदिवासींची उपासमार  आहे तरी विदर्भातील अडचणीत  आलेल्या सर्व आदिवासी शेतकरी व शेत मजुरांना  महाराष्ट्र राज्य  खावटी कर्ज योजना १९७८ प्रमाणे थकित खावटी कर्ज माफ करून खावटी वाटप करावे अशी मागणी विदर्भ जन आंदोलन समितीचे नेते किशोर तिवारी यांनी मुख्यमंत्र्यांना  केली आहे . 
महाराष्ट्र राज्यात खावटी कर्ज योजना १९७८ पासून आदिवासी क्षेत्रात सुरु करण्यात आली आहे . ही योजना या महामंडळाकडून आदिवासी सहकारी संस्थांच्या सहाय्याने  राबवण्यात येते. पावसाळ्यामुळे रोजगार नसलेल्या दिवसांमध्ये गरजू १ लाखावर आदिवासी कुटुंबांना या योजनेअंतर्गत धान्य पुरवठा करण्यात येतो. 

महाराष्ट्र राज्यात खावटी कर्ज योजनेत 70 टक्के वस्तूरूपाने म्हणजे अन्नधान्य व कडधान्य स्वरूपात दिले जाते , तर 30 टक्के आर्थिक स्वरूपाने दिले जाते व  यामध्ये दिलेल्या खावटी कर्जात 30 टक्के अनुदान दिले जाते मात्र यामध्ये मोठ्या प्रमाणात  भ्रष्टाचार होतो म्हणून आदिवासी विकास महामंडळाकडून देण्यात येणाऱ्या खावटी वाटप बंद करून सरळ नगदी रूपाने बॅंकामार्फत  सरसकट सर्वाना देण्यात यावे  अशी मागणीही तिवारी यांनी केली आहे . 
सध्या विदर्भात आदिवास्याना रोजगार मिळत नसल्याने कुटुंबाचा उदरनिर्वाह करण्याचा प्रश्‍न निर्माण झाला आहे अतिदुर्गम भागात रोजगार उपलब्ध होत नसल्याने आर्थिक गरजादेखील पूर्ण होतनसून  तसेच आदिवासी विकास महामंडळाकडून दिल्या जाणाऱ्या या खावटी कर्जात  गरजुंना  देण्यात येत नसुन फक्त  राजकीय नेत्याच्या शिफारशीने हे वाटप आज पर्यंत  होत आले तरी आता सर्व खावटी  कर्जात अनुदानाची वाढ करून सध्या कोणताही रोजगार उपलब्ध होत नसल्याने अनेक अडचणी येत आहेत हजारो आदिवास्याना वनविभागाने शेती करण्यास मज्जाव केला आहे व यामुळे या  काळात रोजगार उपलब्ध होत नाही, तसेच शेती करण्यासाठी जमीन नाही. त्यामुळे उत्पन्न येण्यासाठी दुसरे साधनच नाही. त्यासाठी आदिवासी विभागाकडून देण्यात येणारी  खावटीचा हेच आता जगण्याचा पर्याय आहे तरी सरकारने खावटी वाटप तात्काळ सुरु करावे अशी मागणी किशोर तिवारी यांनी केली आहे. 
==================================================

No comments: