Thursday, October 16, 2014

निवडणुकीच्या प्रचार दरम्यान एकट्या यवतमाळ जिल्यात १० शेतकऱ्यांचा आत्महत्याच्या : सर्वच पक्षांना आत्महत्याग्रस्त दुष्काळ पीडितांचा विसर

निवडणुकीच्या प्रचार दरम्यान एकट्या यवतमाळ  जिल्यात  १० शेतकऱ्यांचा  आत्महत्याच्या : सर्वच पक्षांना आत्महत्याग्रस्त दुष्काळ पीडितांचा विसर 

यवतमाळ -एकीकडे भारताच्या पंतप्रधानासह सर्वच पक्षांचे राष्ट्रीय नेते प्रचार करण्यात व शेतकऱ्यांच्या आत्महत्यांचा बाजार करीत होते याच दरम्यान मागील दहा दिवसात एकट्या यवतमाळ जिल्यात नापिकी व कापसाचे व सोयाबीनचे उभे पिक पाण्याने दगा दिल्याने व  रोगांचा व कीटकांचा हल्लामुळे संपूर्ण यवतमाळ जिल्यातील सहा लाख हेक्टर मधील नगदी कापसाचे व सोयाबीनचे पिक बुड्याल्यामुळे दहा कोरडवाहू शेतकऱ्यांनी आत्महत्या केल्या असून सरकारने विदर्भातील शेती संकटावर जर लक्ष दिले नाहीतर शेकडो कर्जबाजारी  नापिकीग्रस्त कोरडवाहु शेतकरी आत्महत्या करतील असा इशारा विदर्भ जनांदोलन समितीचे नेते किशोर तिवारी यांनी दिला आहे . 
ज्या दहा शेतकऱ्यांच्या आत्महत्या निवडणुकीच्या दहा दिवसाच्या धामधुमीत समोर आल्या त्यामध्ये कोरेगावचे हनुमान गाडेकर ,किन्ही (तिवसाळा )चे  संजय जाधव ,  सायतखर्डा येथील  श्रीकांत ठाकरे ,पळसोनी येथे कर्ज बाजारी शेतकरी बंडू कोकडे तर कोपणा येथील बळीराम पवार हे नापिकी व उपासमारीमुळे आत्महत्या करीत होते या दोन दुर्देवी घटनेपूर्वी  मागील चार दिवसात एकट्या यवतमाळ जिल्यात पाच शेतकऱ्यांनी आत्महत्या करून आपली जीवन यात्रा संपविली असल्याची घटना समोर आल्या आहेत यामध्ये घारफळचे  सुभाष धूरट , सायफळ्चे दत्ता रावते ,पलसीचे आकाश पवार  ,हस्तापुरचे  अमोल चौधरी व वांजरीचे जनार्दन पवार यांचा समावेश ह्या सर्व शेतकऱ्यांनी तिबार पेरणी करून आपले कापुस व सोयाबीनचे पिक उभे केले होते मात्र १५ सप्टेंबर पासून पावसाची दडी, विविध किडींचा प्रकोप आणि शेंगा भरण्याच्या अवस्थेतच सोयाबीनची पानगळ , कापसाचे बोंडे सडल्यामुळे  आणी  सध्या कृषी फिडरवरील २२ तासाचे भारनियमन झालेली नापिकी जबाबदार असून मात्र एकही नेता या विषयावर आवाज उडवीत नसुन जर तात्काळ मदत व भारनियमन बंद झाले नाही तर मोठ्या प्रमाणात ऐन  दिवाळीमध्ये उपासमारीला तोंड देत असलेले  शेतकरी आत्महत्या करतील असा गंभीर इशारा शेतकरी नेते किशोर तिवारी यांनी दिला आहे. 
खुल्या बाजारात कापसाचे भाव हमीभावापेक्षा कमी झाले आहेत व कापसाचे उत्पन्न २०%  टक्का  होत आहे तर संपूर्ण सोयाबीन बरबाद झाले मात्र शेतकऱ्यांच्या प्रश्नांवर मत मागतानाही यावर तोडगा सुचत नाही हि शरमेची बाब आहे ,केंद्र व राज्य सरकार झोपले आहे का असा सवाल ,तिवारी यांनी केला आहे . 
 अशा स्थितीत  यवतमाळ जिल्ह्यातील सहा  लाख हेक्टरवरील सोयाबीन सोंगण्यापूर्वीच भूईसपाट झाल्याचे दिसत आहे तर कापसाची बोंडे गळून पडली आहे  या परिस्थितीतून वाचण्यासाठी शेतकरी ओलिताचा प्रयत्न करीत आहे. मात्र कृषी फिडरवरील २२ तासाचे भारनियमन यावरही पाणी फेरत आहे,निसर्ग प्रकोप शेतकऱ्यांची पाठ सोडायला तयार नाही. काल-पर्वापर्यंत हिरवे दिसणारे शेतशिवार उन्हाच्या तडाख्याने करपले आहे. सुरुवातीपासूनच पावसाचे दृष्टचक्र शेतकऱ्यांच्या पाठीमागे आहे. मृग आणि रोहिणी नक्षत्र कोरडे गेले. उशिरा आलेल्या पावसाने पेरणी उशिरा झाली. सर्वाधिक फटका बसला तो सोयाबीनला व कापूस या नगदी पिकाला  मात्र पावसाचा लपंडाव सुरूच होता. सोयाबीन फुलोऱ्यावर असताना पावसाने पाठ फिरविली. परतीचा पाऊसही बरसला नाही. त्यामुळे आधीच कुपोषित असलेले पीक रोगाला बळी पडले. बुरशीजन्य रोगांचे प्रारंभी आक्रमण झाले. त्यानंतर मोझॅकने कहर केला. हिवरीगार दिसणारी पाने पिवळी पडू लागली. त्यातच उंट अळीचाही प्रकोप सुरू झाला. शेंगा हिरव्या अवस्थेत असतानाच सोयाबीनची पानगळ झाली. सोयाबीनच्या झाडाला पाने नाही आणि अपरिपक्व शेंगा दिसत आहे. अशा स्थितीत अपुऱ्या पाण्यामुळे सोयाबीनच्या शेंगा भरणे कठीण झाले आहे. त्यामुळे जिल्ह्यातील तीन लाख हेक्टरवरील सोयाबीन सोंगण्यापूर्वीच भूईसपाट झाल्याचे दिसत आहे कापसाची नापिकी पेक्षाही जास्त आहे त्यातच निसर्गाच्या लहरीपणासोबतच वीज वितरणाचा मनमानी कारभारही शेतकऱ्यांच्या संकटात भर घालत आहे. सध्या कृषी फिडरवर २२ तासाचे भारनियमन होत आहे. केवळ दोन तास वीज उपलब्ध होत आहे. अशा स्थितीत काही शेतकरी रात्री बे रात्री जाऊन ओलिताचा प्रयत्न करीत आहे. मात्र तेही शक्य होत नाही. वीज वितरणपुढे शेतकऱ्यांनी आता हात टेकले आहे,मात्र शेतकऱ्यांचा . कोणीच वाली दिसत नाही अशा अडचणीत शेतकर्याना फक्त देवच वाचवू शकतो कारण सर्वच नेते शेतकऱ्यांच्या कबरीवर बसून सत्ता काबीज करण्याचा प्रयन्त करीत आहेत याला आता शेतकऱ्यांनीच उत्तर देणे गरजेचे आहे मात्र शेतकरी जाती राजकारणात आंधळा झाल्याची खंत तिवारी यांनी व्यक्त केली .

No comments: