Sunday, October 19, 2014

विदर्भाच्या शेतकऱ्यांना व आदिवासींना तात्काळ दिलासा -भाजपला अभूतपूर्व यशावर विदर्भ जनांदोलन समितीची प्रतिक्रिया

 विदर्भाच्या शेतकऱ्यांना व  आदिवासींना तात्काळ दिलासा -भाजपला अभूतपूर्व यशावर  विदर्भ जनांदोलन समितीची   प्रतिक्रिया 
दिनांक -१९ ऑक्टोबर  २०१४
महाराष्ट्राच्या  विधानसभेत विदर्भाने भाजपला अभूतपूर्व साथ देत ६२ मधुन ४२ आमदार देले आहेत आता विदर्भाच्या शेतकऱ्याच्या ,आदिवासींचा व युवकांच्या समस्या सोडविण्यासाठी वेगळ्या विदर्भाची निर्मिती तात्काळ करावी अशी मागणी विदर्भ जनांदोलन समितीचे नेते किशोर तिवारी यांनी आज केली कारण  जो पर्यंत विदर्भ  महाराष्ट्राच्या गुलामगीरीतून मुक्त  होण्यासाठी सध्या केंद्रामध्ये भाजप सरकार असल्यामुळे आणी वेगळा विदर्भासाठी भाजपला अभूतपूर्व जन समर्थन देऊन  शेतकऱ्यांच्या आत्मह्त्या रोखण्यासाठी ,बेरोजगारांना काम मिळण्यासाठी ,आदिवासींची उपेक्षा व उपासमार थांबण्यासाठी भाजप विदर्भाला दिलासा द्यावा अशी कळकळीची विनंतीही तिवारी यांनी केली आहे 
भाजप नेते नितीन गडकरी , देवेंद्र फडणवीस व सुधीर मूनगटीवार  यांचे या यशावर अभिनंदन करून किशोर तिवारी यांनी  केंद्रामध्ये भाजपचे मोदी सरकार आल्यावर लोकसभेच्या  निवडणुकीमध्ये 'महायुतीने ' सातबारा कोरा करण्याचे ,लागवड कर्ज अधिक ५०% नफा  कापूस ,सोयाबीन व धानाला देण्याचे तसेच संपूर्ण महाराष्ट्र 'टोल मुक्त' करण्याचे स्पष्ट आश्वासन वारंवार देण्यात आले होते याची आठवण करून दिली तर या नेत्यांनी   सातबारा कोरा करण्याचे ,लागवड कर्ज अधिक ५०% नफा  असा हमीभाव कापूस ,सोयाबीन व धानाला देण्याचे तसेच सर्व गरिबाला अन्न व आरोग्य सुरक्षा सह संपूर्ण महाराष्ट्र 'टोल मुक्त' करण्याचे मागण्यावर भाजप पुर्ण करण्याची  तर भाजप नेते नितीन गडकरी यांनी आपल्या ग्रामीण मंत्रालयातून शिरपूर बंधारे बांधण्यासाठी व शेतीसाठी सोलर पंम्प देण्याचे विषेय पकेज घोषित केले व अन्न व निवारा सर्व गरिबांना २०१३ च्या यादी नुसार दारिद्रेषेचे कार्ड व सर्व गरिबांना अंत्योदय अन्न सुरक्षा व घरकुल दिलेल्या शब्दाचे विसर करू नका अशी विनंतीही तिवारी यांनी केली आहे . 
 
विदर्भ जनांदोलन समितीने निवडणुकीपूर्वी सर्व राजकीय  पक्षांशी आपल्या मागण्यासाठी साकडे घातले होते मात्र फक्त भाजपनेच कोरडवाहु शेतकऱ्यांच्या  प्रमुख मागण्या दुष्काळग्रस्त शेतकऱ्यांच्या सात-बारा कोरा करणे, कोरडवाहु शेतकऱ्यांना रोजगार हमी योजनेमधून प्रती हेक्टरी १०० दिवसाची मजुरी सरळ अनुदान रूपाने देणे ,कापूस -सोयाबीन   - धानासाठी  राष्ट्रीय शेतकरी आयोगाच्या शिफारशी प्रमाणे हमीभाव देण,सर्व आदिवासीना तात्काळ खावटी देणे   ,दुष्काळग्रस्त आदिवासी  शेतकऱ्यांच्याना व शेतमजुरांना सरसकट खावटी वाटप   करणे ,सर्व गरिबांना २०१३ च्या यादी नुसार मोफत वैद्दकिय सेवा  व सर्व सरकारी दवाखान्यात जनरिक औषधीचे दुकान, सर्व गरीब वृद्धाना व विधवा , सर्व शेतकरी विधवा ,परितक्त्या महिलांना दरमहा कमीतकमी हजार रुपये मासीक अनुदान व सरकारी नौकर सारखे प्रत्येक महीन्याला १ तारखेला बँकेतून देण्याची योजना या सर्व मागण्या सरकार तांत्रिक अडचणी दूर करून तोडगा काढण्याचे आश्वासन दिले होते  व यासाठीच विदर्भाचे शेतकरी ,आदिवासी व गरीब जनता भाजप सोबत जात आहे अशी माहिती किशोर तिवारी यांनी दिली . 

No comments: