Saturday, September 23, 2017

महाराष्ट्रातील वन्यप्राण्यांच्या समस्येवर कायमस्वरुपी तोडगा काढणार -किशोर तिवारी

यवतमाळ जिह्यातील वन्यप्राण्यांच्या समस्येवर कायमस्वरुपी तोडगा  काढणार -वाघग्रस्त सखी गावात शेतकरी मिशनची घोषणा   
दिनांक -२३ सप्टेंबर २०१७
हा संपुर्ण परीसर वाघमुक्त केल्याशीवाय सध्या सुरु असलेली शोध मोहीम बंद होणार नाही  मात्र वाघाची उचलबांगडी हा एकमेव पर्याय आहे का जंगलात वाघ व गावात गाई संपल्यामुळेच ग्रामीण आर्थिक संकट निर्माण झाले असल्यामुळे वन्यप्राणी समस्येवर एकात्मीक कार्यक्रम राबवून  तोडगा काढण्याचा निर्णय सरकारने घेतला असल्याची माहीती कै वसंतराव नाईक शेतकरी स्वा.  मिशनचे अध्यक्ष किशोर तिवारी यांनी सखी येथील वन्यप्राणीग्रस्तांच्या बैठकीत दिली . या परीसरातील वाघाच्या हल्ल्याच्या घटनांची आमदार डॉ अशोक उईके यांनी पोटतिडकीने  सरकार दरबारी पाठपुरावा करीत असून मस्तवाल जंगलतोड वन विभागावर जनतेचा रोष पाहील्यानंतर आता  सरकारने या घटनांची गंभीर दखल घेतली  असुन परीस्थितीवर वनीमंत्री सुधीर मुनगंट्टीवार स्वतः लक्ष ठेऊन असुन प्रधान सचिव विकास घारगे यांनी आपल्या कार्यालयात विषेय सेल उघडुन यावर दररोज पाठपुरावा करीत असल्याची माहीती यावेळी तिवारी यांनी दिली . यावेळी मयताच्या कुटुंबाला एफ डी सी एमकडून ८ लाखाची मदतीचा धनादेश मिळाल्याची माहीती पांडुरंग कोवे यांनी दिली यावेळी त्यांनी आपली मुलगी बी ए होत असल्यामुळे तिला नौकरीची मागणी केल्यावर तिवारी यानी  विचार करून वनमंत्री सुधीर मुनगंट्टीवार यांचेकडून मार्गी लावण्याचे आश्वासन यावेळी दिले . 
राळेगाव तालुक्यातील सखी परीसरात वाघाने सातच्यावर  निरपराथ आदिवास्यांवर हल्ले केल्यानंतर जनतेचा संताप व आक्रोशाचा सरकारला फटका बसल्यानंतर जागलेल्या वनखात्याचा शोध मोहीमेचा आढावा व या परीसरातील उपासमारीला तोंड देत असलेल्या शेतमजुर व शेतकऱ्यांच्या अडचणी समजुन घेण्यासाठी  शेतकरी मिशनचे अध्यक्ष किशोर तिवारी यांनी सखी येथे भेट दीली . किशोर तिवारी यांनी वाघाच्या हल्ल्यात मयत झालेले आदीवासी सतीश पांडुरंगजी कोवे यांच्याकडे भेट दिली .यावेळी परीसरातील सामाजीक कार्यकर्ते अशोकबापु केवटे ,विजयराव तेलंगे ,मानद वन्यजीव रक्षक डॉ  आर एन विराणी ,उप वनसंरक्षक सौ के एम अभर्ना  एफ डी सी एम चे व्यवस्थापक पुनसे साहेब ,शेतकरी नेते  जानरावजी ठाकरे ,आदीवासी नेते भोनुजी टेकाम ,अंकीत नैताम  ,तलसीलदार हेमंत गांगुर्डे ,आरोग्य अधिकारी डॉ पवार ,गटविकास अधिकारी खेडकर उपस्थित होते . 
गावकऱ्यांच्या समस्याचे निराकरण करण्यासाठी आयोजीत चर्चेत रघुनाथ मेश्राम ,गजानन ढाले ,दत्ता देशमुख भीमरावजी बोटोणी सरपंच कृष्णापूर ,रामरावजी  पुरके सरपंच सखी , अनील सुरपाम यांनी जर दोन महिन्यापूर्वी सराटीच्या वाघाच्या हल्ल्यानंतर वनखात्याने तात्काळ आज करीत असलेली ही  कारवाई केली असती तर चार निरपराथ आदिवासींचे जीव वाचले असते मुख्य वन  वनसंरक्षक चव्हाण यांच्या नाकर्तेपणामुळे ही आणीबाणीची परीस्थिती आल्याची तक्रार केल्यावर या संपुर्ण प्रकरणाची उच्चस्तरीय चौकशी करण्याची व जबाबदार नाकर्त्या अधिकाऱ्यांनाही घरी पाठविण्याची घोषणा तिवारी यांनी यावेळी केली . 
वन्यप्राणी समस्या संपूर्ण महाराष्ट्रात विक्राळ स्वरूप धारण करीत असुन सध्याची नुकसानभरपाई देण्याची पध्द्त शेतकऱ्यांच्या जखमेवर मीठ चोळण्याचा प्रकार असुन या समस्येवर सामूहिक शिवार नायलॉन दोरीची संरक्षण फेन्सिंग पद्धत , वनाआधारित रोजगार निर्मिती ,वन्यप्राणी संरक्षण व रक्षण  प्रशिक्षण , वाघाची हालचाल व गतीचे माहीती दररोज देण्यासाठी प्रशिक्षणप्राप्त युवकांची नियुक्ती,द्रुतगती कृती दल (रॅपीड ऍक्शन फोर्स)ची निर्मिती करणे तसेच वाघग्रस्त भागात वण्यप्राणी,पर्यावरण क्षेत्रातील,समाजशास्त्र विभागाच्या नामवंतांची समिती जिल्हास्तरावर निर्माण करून एकात्मिक कार्यक्रम राबविण्यासाठी वाघाने मारलेल्या निरपराथ आदिवासींच्या मृत्यूचे आपल्या राजकीय पुनर्वसनासाठी वापर न करता सहकार्य करावे असे आवाहन किशोर तिवारी यांनी यावेळी केले . 
=================











No comments: